स्वच्छतेची घडी
दक्षिण भारतातील एक साधासा मुलगा. शाळा सोडलेला. त्याने ग्रामीण महिलांसाठी पाळीच्या दिवसांतील स्वच्छता व आरोग्य ह्यासाठी चांगला प्रयत्न केला. अरुणाचलम मुरुगनंतम् ह्यांनी पाळीची घडी (सॅनिटरी पॅड) तयार करण्याचे यंत्र बनविले, त्याची गोष्ट. सन 1998 मध्ये त्यांचे नवीन नवीन लग्न झाले होते, तेव्हाची गोष्ट.त्यांची पत्नी शांती त्यांच्यापासून काहीतरी लपवीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कसल्यातरी चिंध्या …